झाराप ते माणगांव रस्त्याचे लवकरात लवकर नूतणीकरण करा

साळगाव येथील श्रीधर मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याजवळ मागणी

⚡कुडाळ ता.१९-: : गेल्या कित्येक वर्षापासून झाराप ते माणगांव हा रस्ता दुर्लक्षित करण्यात आला आहे. भरपूर प्रमाणाची वाहनांची वर्दळ असून हा रस्ता मुख्य रस्त्याशी (मुंबई गोवा हायवे ) जोडणारा आहे. असे असून देखील लोक प्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करून वारंवार फक्त खंडडे बुजवून लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर नूतणीकरण करावे, अशी मागणी साळगाव येथील श्रीधर प्रकाश मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याजवळ केली आहे.

निवेदनात मेस्त्री यांनी म्हटले की, आज संपूर्ण देश 75 वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे. परंतु गावाच्या विकासासाठी लागणा-या मुलभूत गरजांसाठी आजही सामन्य जनतेला सरकारकडे वारवार मागणी करावी लागत आहे. या सारखी दुसरी कुठलीही खंत नाही. या गावात कायम रहदारीची समस्या नेहमी येत असून त्यामुळे होणा-या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या रस्त्याची अवस्था एवढी दयनीय आहे की, दोन्ही बाजूनी साइड पटटी पूर्णपणे खचलेली आहे. या रस्त्याने चालत असताना देखील अतिशय त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर झाराप साळगांव गाँव जोडणार एक पुल असून तो पूर्ण पणे अजीर्ण झाला असून तो काही कोसळून जीवीत हाणी होण्याची शक्यता आहे. शिवाय हा रस्त पूर्णपणे अरुंद असून साईड पटटी देखील नाही आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतणी करण व रुंदीकरणा बाबत ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आम्हाला या मागणी साठी आमरण उपोषण करण्यास भाग पडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page