खासदार नारायण राणे यांचा इशारा
*💫ओरोस दि ३०-:* एकीकडे वीजबिल माफीची घोषणा करून दुसरीकडे वीजबिल न भरणाऱ्यांचे विजकनेक्शन तोडणाऱ्या राज्य सरकार विरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. वाढीव विजबिले माफ करण्याची फसवी घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र प्रत्यक्षात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारने वीजबिल न भरलेल्यांचे विजकनेक्शन तोडायला सुरवात केली आहे. याच्या निषेधार्थ भाजपा आंदोलन छेडेल असा इशारा खासदार राणे यांनी दिला.
