माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वीज अधिकाऱ्यांना विचारला जाब
सावंतवाडी : बंद पडलेल्या विद्युत मीटरच्या बिलांनी ग्राहकांना नाहक त्रास होत असल्याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उप अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी सावंतवाडी यांना निवेदन देत जाब विचारला आहे.
श्री. भोगटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की,
बंद असलेल्या मीटरचा बसनारा भुर्दंडबाबत तसेच महावितरकडून होणारा सावळ्या गोंधळाबाबत, सावंतवाडी व इतर परिसरातील विज ग्राहकाचे काही ठिकाणी विद्युत रिडींगचे मिटर बंद पडलेले असतात. त्यामुळे ग्राहकांना बेहिशोबी सरासरी बिल पाठवण्यात येतात. ती बिल अव्वाच्या सव्वा असतात. हा विषय बऱ्याच ग्राहकांच्या लक्षात येत नाही. मात्र दर महीने ही बिले सरासरीच येतात. जेव्हा मिटर बंद आहे हे समजत तेव्हा ग्राहक आणि कंपनीचे वाद सुरु होतात. मुळामध्ये मिटर बंद पडला की ग्राहकांना लेखी समज, नोटीस ने कळवणे कंपनीचे काम आहे. मात्र तसे कंपनीकडून होत नाही त्यामुळे हा सावळा गोंधळ घेवून ग्राहकांना नाहक हजारो रुपये मोजावे लागतात. मग कंपनीकडून नेहमीची उत्तरे ‘प्रथम आलेले बिल भरा, नंतर मिटर बदलवण्यासाठी अर्ज करा!’ अशा प्रकारे होणारे ग्राहकाचे नुकसान हे कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे होत आहे. हे तात्काळ थांबवावे. ग्राहकाचे वापरातील मिटर विनामूल्य कोणताही चार्ज न घेता, दर वर्षानी करावा. तसेच ग्राहकांना होणारा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड थांबवावा, असा जाब भोगटे यांनी महावितरण कंपनीला विचारला आहे.
