अनुसूचित जाती सेलच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती
⚡कणकवली ता.१४-: कणकवली येथील काँग्रेस कार्यकर्ते महानंद चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून
महानंद चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे काँग्रेसला धक्का आहे.शिवसेना अनुसूचित जाती सेलच्या उपतालुकाप्रमुखपदी महानंद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवानेते संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, उपतालुकाप्रमुख महेश कोदे, महिला उपशहरसंघटीका दिव्या साळगावकर, योगेश मुंज, अमित मयेकर, सोमा गायकवाड, प्रसाद चव्हाण, भिवा परब आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
