8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार..?
⚡पणजी दि.१४-: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षाचे 8 आमदार गोवा विधानसभेत पोहोचले असून. ते आताच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपच्या वाटेवर जात आहेत. सर्व धर्म पाळणारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला असल्याची माहीती गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नजिर खान यांनी दिली होती.
