सावंतवाडी : सालईवाडा येथील गजानन कुडपकर यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले होते. त्या घराच्या छप्पर दुरुस्तीसाठी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यावतीनं आर्थिक मदत देत त्या कुटुंबाला आधार देण्यात आला. अँड.सौ.निता सांवत कविटकर, माजी नगरसेविका भारती मोरे बाबु कुडतरकर, अशोक दळवी, गजानन नाटेकर, शब्बिर शेख यांनी ही मदत कुडपकर कुटुंबास सुपुर्द केली. यावेळी कुडपकर कुटुंबाकडून मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानण्यात आले.
अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घराच्या दुसिस्तीसाठी मंत्री केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत
