मान्यता कुंटे, आनंद बिर्जे गाणार गाणी
⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील सालईवाडा गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आज 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता सौ. मान्यता कुंटे आणि श्री. आनंद बिर्जे यांचा सुमधुर असा भक्तिगीते आणि भावगीते गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच उद्या 15 सप्टेंबर रोजी श्री सद्गुरू संगीत विद्यालय प्रस्तुत ‘हे सुरानो चंद्र व्हा’ हा संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तरी गणेशभक्तांनी आणि संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
