⚡कणकवली ता.१२-: कुंभार समाज सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष कलमठ गावचे रहिवासी विलास हरी गुडेकर यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीपदी निवड झाली आहे.
विलास गुडेकर हे संत गोरोबाकाका माती कला बोर्ड महाराष्ट्र शासनचे माजी संचालक असून कुंभार समाज संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी कार्यरत आहेत. कुंभार समाजाच्या हितासाठी गुडेकर यांचे सातत्यपूर्ण योगदान लक्षात घेत राज्याचे अध्यक्ष सतीशदादा दरेकर यांनी गुडेकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटनिसपदी नियुक्ती केली आहे. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर कार्यरत असणारे विलास गुडेकर हे स्व. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहेत. विलास गुडेकर यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
