जोरदार घोषणाबाजी करीत आप्पा जोशींचा पुतळा जाळला
⚡कणकवली ता.१२-: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक आप्पा जोशी नामक व्यक्तीने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. शिवसेनेच्यावतीने आम्ही याचा निषेध करतो. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्यावतीने देण्यात आला. यावेळी आप्पा जोशी यांच्या प्रतीकात्मक
पुतळ्याचे दहनही करण्यात आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक आप्पा जोशी यांनी नाम.उदय सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा माजी जि. प. सभापती संदेश पटेल यांनी निषेध केला. शिंदे गटाचे शिवसैनिक माजी नगरसेवक भूषण परुळेकर, सुनील पारकर, सुनील हरमळकर, शेखर राणे, बाळू पारकर, दीपक राऊत, प्रमोद सांगवेकर, दामू सावंत, दिलीप घाडीगावकर आदी उपस्थित होते.
उदय सामंत यांना अशी धमकी देण्याचे सोडा, पण वाकड्या नजरेने बघितले तरी योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी आपा जोशी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत त्यांचा निषेध करण्यात आला.
