वैभववाडी प्रतिनिधी
करूळ गावठण ब येथील रहिवाशी तुकाराम रामचंद्र कोलते(गुरुजी) वय 80 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी कर्तव्यदक्षपणे सेवा बजावली होती. मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. विद्या मंदिर करूळ गावठण अ प्रशालेत अनेक वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. पांडुरंग कोलते यांचे ते वडील होत. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. गावातील स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम कोलते यांचे निधन
