बॅ .नाथ पै जन्मशताब्दी कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.११-: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने बॅ नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व बॅ ना थ पै स्मृती चषक स्पर्धा 21 सप्टेंबर रोजी कुडाळ येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्था येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटासाठी आहे येत्या 24 सप्टेंबर रोजी बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी अभिवादन सभा होणार आहेत. त्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वकृत्व स्पर्धेसाठी अठरा वर्षा वरील खुल्या गटासाठी विषय आहे बॅरिस्टर नाथ पै युग नायक यावर सात मिनिटे प्रथम पारितोषिक 1500 व स्मृती चषक द्वितीय बाराशे स्मृती चषक तृतीय 1000 व स्मृती चषक तसेच दोन उत्तेजनात पाचशे व चषक या स्पर्धेसाठी 20 सप्टेंबर पर्यंत आपली नावे वृंदा कांबळी 94 21 26 20 30 वर नोंदवावी तर निबंध स्पर्धे साठी खुला गट असून स्व अक्षरात निबंध फुल स्केप वर एक हजार शब्द मर्यादित विषय कोकणच्या विकासात बॅ ना थ पै यांचे योगदा न 20 सप्टेंबर पर्यंत रामचंद्र कुबल ९४२०२१०८११ व गुरुनाथ ताम्हणकर मालवण बागायत यांच्याकडे पाठवावी त प्रथम पारितोषिक 1500 1200 1000 व स्मृती चषक प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे व दोन उत्तेजनार्थ पाचशे रुपये व स्मृती चषक प्रायोजक बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण 24 सप्टेंबर च्या कार्यक्रमात कुडाळ येथे महालक्ष्मी हॉल येथे जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी होणार आहे तर या स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन व खुल्या गटातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के व सचिव विठ्ठल कदम व कार्याध्यक्ष भरत गावडे आधी जिल्हा कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.
