*💫मालवण दि.२९-:* मालवण मेढा जोशीवाडा येथे विद्युत वाहिनीला माडाचे झावळ लागून झालेल्या स्पार्किंगमुळे विजेचा उच्चदाब निर्माण होऊन या परिसरातील काही घरांमधील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. जोशीवाडा येथे बुधवारी रात्री वीज वहिनीला माडाचे झावळ लागून पोलवरील लाईन व घरगुती विजेची लाईन एकत्र होऊन स्पार्किंग झाले. त्यामुळे विजेचा उच्चदाब निर्माण होऊन काही घरात ज्यादा वीज पुरवठा झाल्याने यामुळे घरातील वीज उपकरणे खराब झाली. तर तेथील शिवमुद्रा संग्रहालय येथे चार विद्युत दिवे, दोन हॅलोजन एक ट्यूबलाइट व सीसीटीव्ही कॅमेरा आणि दोन छोटे पावर ट्रांसफार्मर नादुरुस्त झाले आहेत. या विद्युत उपकरणे खराब झाल्याने येथील नागरिकांचे नुकसान झाले आहे.
जोशीवाडा येथे विजेच्या उच्चदाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान…
