कणकवली विकास आखड्याबाबत बंडू हर्णे यांनी अज्ञान प्रकट करू नये

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा टोला

⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवली आराखड्याबाबत आपले अज्ञान प्रकट करू नये,असा टोला मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी लगावला आहे .परशुराम उपरकर यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने उत्तर दिले.

सन १ ९९९ मध्ये कणकवली शहराचा विकास आराखडा शासनाच्या नगररचनाकारांकडून तयार करून त्यावर हरकती नोंदविण्याकरिता जिल्हापरिषदेकडे आला होता . त्या हरकती नोंदविण्याकरीता जि.प. कडील कमिटी ठिकठिकाणी फिरून हरकती नोंदवून घेतल्या . त्यातील डी.सी. नियमांप्रमाणे जी आरक्षणे काढता आली, ती वगळता व डी . सी . नियमातील लोकसंख्येच्या निकषांप्रमाणे वॉर्डावॉर्डात व शहरात जी आरक्षणे ठेवावी लागतात.ती आरक्षणे ठेवलेली होती. जी वगळणे शक्य होते ती नगररचनाकारांनी वगळली होती . त्या जिल्हा परिषद कमिटीमध्ये सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजन तेली होते .त्यांच्या अध्यक्षतेखाली या डी . पी . प्लॅनला जि. प. मध्ये मंजुरी देण्यात आली . त्यानंतर शासनाने मंजुरी दिली ती सुद्धा श्री . बंडू हर्णे यांच्या पक्षाचे नेते व तत्कालीन या भागाचे आमदार व सध्याचे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या सहीने कणकवलीच्या डीपी प्लॅनला शासनाने मंजुरी दिलेली होती. हे बंडु हर्णे जनतेला सांगायला सोईस्कररित्या विसरले का?

बंडू हर्णे हे स्वतःला आरक्षणातील नियमांचे व बांधकामांच्या अभ्यासू किडा समजतात . पण त्यांनी नवीन आलेल्या डेव्हलपमेंट प्लॅन तपासून पहावा . शहराला व प्रत्येक वॉर्डासाठी किती गार्डन , शाळा , शौचालये , दवाखाने अशा प्रकारची नियमांप्रमाणे किती आरक्षणे ठेवावी लागतात व त्यासाठी खुल्या जागा किती व कुठे आहेत ते तपासावे व कोणकोणती आरक्षणे लादलेली आहेत हे समजून घ्यावे . सध्याच्या असलेल्या आरक्षित जागांच्या जागा मालकांना घाबरवून आरक्षणाच्या जागा कमी दरात घेऊन बिल्डरांच्या व विकासकांच्या घशात घालण्यासाठी आगाऊ आर्थिक तडजोड करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न मनसे जनतेला सोबत घेऊन हाणून पाडेल . कणकवली शहराचा विकास आराखडा सुधारीत होत असल्याने या संदर्भात ए.एल.यु. चारपाच महिन्यांपूर्वी झाला हे श्री . बंडू हणे यांना माहित नसणे हे तुमचे अज्ञान असल्याचे श्री . दया मेस्त्री यांचे म्हणणे आहे . या प्लॅनबाबत आपण सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना माहित नसणे हे अज्ञान आहे. साईडच्या नागरिकांना न कळवता साईड व्हीजिट झाली . त्याची माहिती नगरपालिकेच्या सभागृहात न देता त्यांनी परस्पर केली हे तुमचे अपयश व अज्ञान आहे . श्री . बंडू हर्णे यांनी सत्ताधाऱ्यांचे मार्गदर्शन न घेता इतरांचे मार्गदर्शन घेऊन आपले विचार मांडणे योग्य नाही ते थांबवावे . मनसे याबाबत फेरबैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी व नगरपंचायतीकडे मागणी करणार वेळप्रसंगी अल्पावधीत लावलेल्या बैठकीची तक्रार करणार . शिवाय जनतेला आगाऊ सूचना देऊन प्रत्येक वॉर्डात आरक्षणाच्या जागेवर नेऊन विकास आराखडा दुरूस्त करण्यास भाग पाडणार असा इशारा दया मेस्त्री यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page