दीपक केसरकर व शंकर कांबळी यांच्यात झाली एक तास चर्चा

शंकर कांबळी यांचा प्रवेश झाल्यास शिवसेनेला बसणार मोठा फटका..?राजकीय चर्चेला उधाण

सावंतवाडी : शिवसेनेचे वेंगुर्ले कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शंकर कांबळी व शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर या दोघांमध्ये शंकर कांबळी याच्या निवासस्थानी एक तास चर्चा झाली.
जर शंकर कांबळी शिंदे गटात दाखल झाले तर हा प्रवेश सेनेला कोकणात मोठा धक्का मानला जात आहे
शिवसेना माजी आमदार व पूर्वीचे सेनेच्या बडाच्यावेळी नारायन राणे यांच्या समवेत असलेले पण त्यानंतर राणेंना फारकत घेत केसरकर याच्या समवेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार शंकर कांबळी यांच्यात चर्चा झाल्याने शिदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे सेनेला जिल्ह्यात खिडार पाडत उद्धव ठाकरे यांच्या अबाधित कोकणला धक्का देण्याचे तयारीत आहेत.

You cannot copy content of this page