बांदा तपासणी नाक्यावर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक

पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले : ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान

बांदा /प्रतिनिधी
बांदा पोलीस तपासणी नाक्यावर तपासणीसाठी उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅकने जोरदार धडक दिली. या अपघातात येथे सेवेवर असलेले पोलीस कर्मचारी बालंबाल बचावलेत. मात्र ट्रॅकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला.

You cannot copy content of this page