सुमारे ४३ लाखांच्या दारुसह ५५ लाखांवर मुद्देमाल केला जप्त;एकाला केले अटक
बांदा
गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज सकाळी मोठी कारवाई केली आहे . या कारवाईत विविध ब्रँडचे ६०० दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले . कारवाईत ४३ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या दारुसह १२ लाखांचा टेम्पो असा एकूण ५५ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला . बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी संजय मारुती गवस ( ४२ , रा . वाफोली , मधलीवाडी ) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली . गोव्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदा दारु वाहतूक रोखण्यासाठी एक्साइजचे कोल्हापूर भरारी पथक कार्यरत झाले आहे . आज सकाळी गोव्यातून येणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला . टेम्पोवर ( एमएच ४६ एफ २३ ९ ८ ) व ( जीए ०५ टी ३०० ९ ) अशी दोन नंबर प्लेट चिकटविलेली होती . अधिकाऱ्यांना संशय आल्याने तपासणी केली असता टेम्पोत ६०० दारुचे बॉक्स आढळून आले . याप्रकरणी वाफोलीच्या संजय गवस या तरुणाला अटक करण्यात आली . सदर कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त बी . एच . तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस . जे . डेरे , दुय्यम निरीक्षक आर . जी . येवलुजे , एस . एस . गोंदकर , काँस्टेबल सुशांत बनसोडे , विलास पवार , अमोल यादव , दीपक कापसे यांच्या पथकाने केली . अधिक तपास एस . एस . गोंदकर करीत आहेत .
