सिंधुगर्जना ढोलताशा पथक ही सांस्कृतिक चळवळ…

सातवसे;सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा तृतीय वर्धापनदिन साजरा

⚡कणकवली ता.०९-: सिंधुगर्जना ढोलताशा पथक ही महाराष्ट्राची अखंड परंपरा जोपासण्यासाठी उभी केलेली एक सांस्कृतिक चळवळ आहे असे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कृष्णराज सातवसे यांनी केले.

एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा तृतीय वर्धापनदिन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे कार्याध्यक्ष सर्वेश भिसे यांच्या हस्ते पूजा व वाद्यपूजन करण्यात आले.

तृतीय वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कृष्णराज सातवसे, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी सभापती बुलंद पटेल,ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. निलेश महेंद्रकर, कणकवली अर्बन निधीचे सेक्रेटरी रंजन चव्हाण, युनियन बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक प्रबंधक सुशांत माने, सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या अध्यक्ष सौ. सुरेखा भिसे प्रा.हरीभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे,खजिनदार शुभम पवार,पथक प्रमुख नितीन चव्हाण,उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे,महिला प्रमुख रिदा मन्सूरी,महिला उपप्रमुख नेहा चव्हाण व इतर पदाधिकारी आणि सिंधुगर्जना पथकाचे सर्व सभासद उपस्थित होते.तृतीय वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांनी पथकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, मान्यवरांचा आणि पथकातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा चव्हाण आणि चेतन साटम यांनी केले.

You cannot copy content of this page