⚡वेंगुर्ला ता.०८-: गणेश चतुर्थीला गणपतीसमोर श्रीसत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते. या पूजेसाठी लागणारी मखर हा एक आकर्षणाचा विषय असतो. तुळस काजरमळी येथे पुंडलिक विठ्ठल परब यांच्या घरी श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी चांदणी स्वरूपात बनविलेले मखर लक्षवेधी ठरत आहे. हे मखर रोहित परब, राहुल परब, स्वपनिल परब, तुषार परब, दत्तात्रय परब यांनी बनविले आहे.
चांदणी स्वरुपातील मखर लक्षवेधी
