विविध रुपातील 10 बाप्पांची रेखाटली चित्रे

वारगाव येथील चिमुकल्या बहीण भावाने दाखविली कला

⚡कणकवली ता.०८-:
कणकवली तालुक्यातील वारगाव येथील कैवल्य हेमंत मेस्त्री आणि कृष्णा सुर्यकांत पांचाळ या चिमुकल्या बहीण भावाने गणेशोत्सव काळात अगदी सहज सोप्या विविध रुपातील 10 बाप्पांची चित्रे रेखाटली आहेत. चित्रकलेची आवड असणाऱ्या या चिमुरड्या कलावंत बहीण भावाने बाप्पाप्रती असलेली भक्ती कलेमधुन व्यक्त केली. 

मुळ वारगाव येथील व सध्या मुंबई येथे असलेले कैवल्य हेमंत मेस्त्री आणि कृष्णा सुर्यकांत पांचाळ ही बहीण भाऊ गणपतीसाठी आपल्या वारगाव गावी आलेत. या गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी आपली चित्रकलेची आवड जोपासलीच शिवाय गणपती बाप्पाची सहज सोपी चित्रे रेखाटून आपली भक्ती व्यक्त केली. कैवल्य हा आठवी तर कृष्णा ही मालाड़ येथील महाराणी सईबाई विद्यामंदीरमध्ये पहिलीत शिकत आहे.

कृष्णाला कलेचा वडिलांकडून वारसा (चौकट)

कृष्णा हिचे वडिल सुर्यकांत पांचाळ हे नामवंत हार्मोनियम कारागिर आहेत. मुंबई येथे हार्मोनियम तयार करत असुन त्यांच्याकडील हार्मोनियम देशात विविध ठिकाणी तसेच अमेरिकेतही जातात. त्याशिवाय ते उत्कृष्ट रांगोळी कलाकार आहेत. त्यांच्या कलेचा वारसा कृष्णा पुढे चालवत आहे. 

कृष्णा पहिलीमध्ये शिकत आहे. ती सुप्रसिध्द गायक, गौरव महाराष्ट्राचा फ़ेम सागर मेस्त्री यांच्याकडे गायनाचे धडे घेत असून भरत नाट्यमही शिकत आहे. तिला चित्रकलेची आवड असून एवढया कमी वयातही तिने बाप्पाची अगदी सहज सोपी विविध रुपातील चित्रे काढून आपली भक्ती व्यक्त केली आहे. 

तिने शुन्य, 4 टिंब, ओम मधून, 8, 9 आणि 5 अंकापासून बाप्पाची विविध सुंदर रुपे साकारली आहेत. विशेष म्हणजे अगदी साध्या सोप्या पध्दतीने काढता येतील अशी ही बाप्पाची चित्रे असून त्यासाठी तिला वडिल सुर्यकांत पांचाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. 

You cannot copy content of this page