हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर पासून

मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ व्या हौशी मराठी नाटय स्पर्धेची सिंधुदुर्ग केंद्राची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर पासून मामा वरेरकर नाटयगृह या ठिकाणी सुरू होणार असून या राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त नोंदणीकृत नाटय संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा समन्वयक संजय शिंदे यांनी केले आहे.

६१ व्या हौशी मराठी नाटय स्पर्धेची सिंधुदुर्ग केंद्राची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर पासून मामा वरेरकर नाटयगृह या ठिकाणी सुरू होणार आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग केंद्रामध्ये आणण्याचा प्रमुख उद्देश हा होता की जिल्हयातील जास्तीत जास्त नाटय संस्थांना व नाटय कलावंतांना या स्पर्धेत सहभागी होता यावे. सिंधुदुर्ग केंद्रावर ही स्पर्धा सन २०१८ साल पासून सुरू झाली आहे . यावर्षी आपल्या केंद्रावरील या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. सुरुवातीपासूनच या स्पर्धेला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. जिल्हयातील नामांकित नाटय संस्था या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या दर्जेदार नाटयकृती सादर करत असतात. या स्पर्धेमध्ये सहभागी होणान्या नाटयसंस्थांना शासनाच्यावतीने नाटय निर्मिती खर्च सहभागी कलावंतांना दैनिक भत्ता, स्थानिक नाटयसंस्था वगळून इतर नाटयसंस्थेतील कलावताना प्रवास खर्च तसेच सादरीकरणा दिवशीच्या तिकीट विक्री रक्कमेतील ५०% हिस्सा नाटय संस्थांना देण्यात येतो. त्यामुळे हौशी नाटयसंस्थांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होतो. जिल्हयातील नाटय संस्था व त्यातील कलावंतांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. यासाठी जास्तीत जास्त नाटयसंस्थांनी सहभागी व्हावे. स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०२२ हा असून स्पर्धेसाठी विहीत नमुन्यातील प्रवेशिका नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाइटवर नवीन संदेश या मळयाखाली उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी संजय शिंदे जिल्हा समन्वयक भ्रमणध्वनी ९४२२२३४९५० वर संपर्क साधावा असे आवाहन संजय शिंदे यांनी केले आहे

You cannot copy content of this page