देवगड पोलीस स्थानकातील ७ पोलिसांना पदोन्नती

⚡देवगड ता.०२-: सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनातील पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांना पदोन्नतीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काढले .यात देवगड पोलीस स्थानकातील २ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे ,तर ५ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. पदोन्नती प्राप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पोलीस हवालदार विठ्ठल जोशी, रमाकांत पुजारे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस नाईक पदी सेवा बजावत असलेले प्रवीण सावंत, अमित हळदणकर ,आशिष कदम, प्रशांत जाधव,महिला पोलीस नाईक रूपाली सासणे यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page