श्री भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
येथील श्री भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांसाठी यावर्षी सुद्धा १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.


वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आल्मेडा यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, संचालक राजेंद्र विठ्ठल वाळके, अशोक सावंत, अशोक शंकर देसाई , रेश्मा रामदास आईर, सालू जाकी परेरा, संजय दिगंबर नाईक , व्यवस्थापक भिकाजी गवस आदी उपस्थित होते. संस्थेला सलग सातव्या वर्षी ‘अ’ वर्ग मिळाल्याने अभिनंदन करण्यात आले. कोविड कालावधीत संस्थेला नफ्यात आणण्यासाठी व ‘अ’ वर्ग कायम राखल्याबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केल्याने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. आभार वालेतीन आलमेडा यांनी मानले. यावेळी संस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

You cannot copy content of this page