असरोंडी- कणकवली रस्त्यावरील खड्डे बुजविले

माजी सभापती सुनील घाडीगांवकर व असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांचा पुढाकार

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यातील असरोंडी मुख्य रस्ता ते कसरल सातरल कणकवली या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. गणेश चतुर्थी सणाला चार दिवस शिल्लक असून गणेशभक्त व चाकरमानी यांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये याबाबत काळजी घेत भाजप नेते, माजी सभापती सुनील घाडीगांवकर आणि असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकारातून असरोंडी मुख्य रस्ता ते कसरल सातरल कणकवली मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या चाकरमानी, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुनील घाडीगावकर व मकरंद राणे यांच्या प्रयत्नातून या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. याबाबत ग्रामस्थनामधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बूथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत, रघुनाथ सावंत, बेटा गावडे, प्रदीप सावंत, राघू गावकर, सूनिल असरोंडकर यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page