शिवसेना शिंदे गटाने दिला विजवितरणला सज्जड इशारा
⚡कणकवली ता.२६-: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर विजवीतरणचे कर्मचारी ग्राहकांच्या दारात विजवसुलीला जात असून वीज कनेक्शन तोडत आहेत. जर यापुढे गणेशचतुर्थीच्या काळात वीज कनेक्शन तोडाल तर खबरदार …कायदा हातात घ्यायला लावू नका अशा सज्जड शब्दांत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजवीतरण कार्यालयावर धडक देत इशारा दिला. माजी सभापती संदेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज विजवितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांच्याशी चर्चा करताना तालुक्यातील ग्रामीण भागातील विजग्राहकाना विजवीतरण अधिकारी ,कर्मचाऱ्या कडून होणाऱ्या त्रासाबद्दल जाब विचारण्यात आला.संदेश पटेल यांनी 15 सप्टेंबर पर्यंत गणेशचतुर्थी काळात वीजग्राहकांना वीजबिलवसुली चा तगादा लावू नये. थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन गणेशचतुर्थी काळात खंडित करू नये. गणपती चे आगमन अंधारात कोणाच्याही घरी होता नये याची खबरदारी घ्या अशी सक्त सूचना केली. तर जबरदस्तीने कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा गणेशचतुर्थी काळात खंडित कराल तर कायदा हातात घेऊ असा इशाराच माजी नगरसेवक भूषण परुळेकर यांनी दिला. गणेशचतुर्थी काळात वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी आपली मॅन पॉवर वापरा अशी सूचनाही यावेळी विजवीतरण अधिकाऱ्यांना करण्यात आली. कोव्हिड- 19 नंतर 2 वर्षांनी गणेशभक्त मोठ्या उत्साहाने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत आणि गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी करत आहेत. अशा वेळी ग्रामीण भागात विजवीतरण चे अधीकारी, कर्मचारी वीजबिलवसुली आणि विजकनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यासाठी घरोघरी फिरत आहेत.मात्र कणकवली शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा मात्र सुरळीत होत नाही याकडे सुनील पारकर यांनी लक्ष वेधले. चर्चेअंती अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांनी गणेशचतुर्थी काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन दिले.यावेळी भास्कर राणे, शेखर राणे, राजन म्हाडगुत, दामू सावंत, मारुती सावंत, दीपक राऊत आदी उपस्थित होते. जर विजवीतरण कडून गणेशचतुर्थी काळात विजकनेक्शन तोडले तर शिंदे गटाचे संदेश पटेल मोबा.9764459111, भूषण परुळेकर मोबा. 9373893318,
शेखर राणे मोबा.9404440014,सुनील पारकर मोबा. 9423402626 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
