ना. रविंद्र चव्हाण यांचे 27 रोजी कणकवली पटवर्धन चौकात भव्य स्वागत

नगराध्यक्ष समीर नलावडे आणि गोट्या सावंत यांनी केले आयोजन

⚡कणकवली ता.२६-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे 27 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ना.रवींद्र चव्हाण यांचे ढोल ताशांच्या गजरात कणकवली पटवर्धन चौकात दुपारी 12.30 वाजता
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते .
भव्य स्वागत करण्यात येणार आहे
भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन देखील श्री नलावडे व सावंत यांनी केले आहे. कणकवली नगरपंचायत ने गणेश चतुर्थी कालावधी करिता उभारलेल्या व्यासपीठाच्या ठिकाणी हे स्वागत करणार असून मंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन होत असल्याने हे स्वागत देखील मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page