⚡कणकवली ता.२४-:
कणकवली तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदी
ॲड. अनिल बर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी ॲड. स्वप्नील सावंत यांची तर खजिनदारपदी प्रतिमा सातवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारणीच्या सदस्यपदी अक्षय चिंदरकर, ॲड. अजितसिंह काळे व ॲड. राधिका मुंज यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, कणकवली तालुका बारचे माजी अध्यक्ष ॲड. विद्याधर चिंदरकर, ॲड. बी. एम. दळवी, ॲड. राजेश परुळेकर, ॲड. उमेश सावंत, ॲड. एम. जी. रावराणे, ॲड. दीपक अंधारी, ॲड. विरेश नाईक, ॲड. प्रदीप सावंत, ॲड. मिलिंद सावंत, ॲड. विलास परब यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
कणकवली तालुका बार असोशिशन अध्यक्षपदी ॲड. अनिल बर्वे तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे
