अन्यथा पोलीस स्थानकावर मोर्चा काढावा लागेल;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२३-: शहरासह तालुक्यात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेक संघटनांनी पोलिसांना याबाबत निवेदन देऊनही पोलिस या चोरीच्या तपासात दखल घेत नसल्याचे जाणवत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
यावेळी कोकणचे आराध्य दैवत सोनुर्ली येथील माऊली मंदिरात झालेली चोरी हे पोलिसांचं अपयश असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यावेळी वेगळी पथक तयार करून या चोरीच्या घटनांचा तपास करा. अन्यथा पोलिस स्थानकात तालुक्यातील लोकांना घेऊन मोर्चा काढणार असा इशारा बबन साळगावकर यांनी दिला आहे.
