शिवसेना उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांना कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन
⚡कणकवली ता.२३-: कणकवली नागवे रोड स्वयंभू मंदिर रस्त्यावरील खड्डे जांभा दगडाने बुजवून रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग, कणकवली यांनी दिले असल्याने शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख वैभव चंद्रकांत मालंडकर यांनी आंदोलनाचा इशारा मागे घेतला आहे.
कणकवली शहरातील नागवे रोड स्वयंभू मंदिरकडे जाणारा नागवे रोड पूर्णतः खड्डेमय झाला असून वाहनचालक,विद्यार्थी,पादचारी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे .या रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे.याबाबत वरवार सबंधित विभागाला रस्ता दुरुस्ती बाबत कल्पना देवून ही दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नसून अनेकांना या रस्त्याच्या समस्येमुळे दुखापतींना तोंड द्यावे लागत आहे.
गणेश चतुर्थीपूर्वी या रस्त्याची डागडुजी करावी. व हा रस्ता वाहतुकीस योग्य करावा.
अन्यथा आपल्या कार्यालया बाहेर आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख वैभव मालंडकर यांनी दिला होता.या निवेदनाची दखल घेवून कार्यकारी अभियंता यांनी सदर रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत करणार असल्याचे सांगितले यावेळी वैभव मालंडकर यांच्या समवेत राजू राठोड उपस्थित होते.
