तर कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची तडकाफडकी बदली
⚡कुडाळ ता.२१-: सिंधुदुर्ग पोलीस विभाग तर्फे अचानक दोन पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आले आहेत .त्यानुसार कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र तुकाराम हुलावळे यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी वर्णी लावण्यात आली.तर सध्या कार्यरत असलेले फुलचंद मेंगाडे यांची तडका -फडकी बदली करण्यात आली . सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने २०ऑगस्ट रोजी पत्राद्वारे माहिती देण्यात आली. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
