⚡वेंगुर्ला ता.२१-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनतर्फे बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष सुनिल रेडकर, सेक्रेटरी पंकज शिरसाट, आ.डी.सी.संजय पुनाळेकर, सदाशिव भेंडवडे, आनंद बांदेकर, वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण, प्रा.शितोळे, योगेश नाईक, मुकूल सातार्डेकर आणि प्राचार्य डॉ.विलास देऊलकर उपस्थित होते. यापुढेही रोटरीच्या माध्यमातून गरजू मुलांना शैक्षणिक मदत केली जाणार असल्याचे अध्यक्ष सुनिल रेडकर यांनी सांगितले.
