*💫कणकवली दि२७-:* वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा असा अट्टाहास आजही सो कॉल्ड पुढारलेल्या समाजात केला जातो. मात्र एकुलती एक मुलगी असलेल्या श्वेता हिने वडिलांच्या निधनानंतर निधन झालेल्या आपल्या आईचे दहनविधी मोठ्या धीराने केले. कणकवली शहरातील गांगो मंदिर नजीक राहणाऱ्या श्वेता विजय शिरोडकर हिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. श्वेताची आई वंदना चे १० दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाले. उपचदरम्यान श्वेताच्या आईचेही २६ जानेवारी रोजी निधन झाले. तेव्हा मोठ्या धीराने श्वेताने आपल्या आईचे दहनविधी दहनभूमीत स्वतः पूर्ण केले. बी कॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि आता बँकिंग क्षेत्रात करिअरची इच्छा बाळगून बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या श्वेताने मोठ्या धाडसाने या आपत्तीला तोंड दिले. याप्रसंगी डॉ संदीप नाटेकर, डॉ प्रतिमा नाटेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, स्वप्नील कदम, संजय नाईक, प्रतीक नाटेकर यांनी सहकार्य केले.
आईच्या चितेला मुलीनेच दिला मुखाग्नी…
