*💫आंबोली दि.२७-:* श्रीदेवी माऊली मंदिराच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन आंबोलीतील आजी माजी सैनिक संघटनेने केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे तसेच सर्व आजी माजी सैनिक शहिदांच्या पत्नी ऊपस्थित होत्या सावंतवाडीचे तहसीलदार म्हात्रे यांनी शहिद पांडुरंग गावडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. आंबोलीत माजी सैनिकांना संघटना करून प्रथमच अशा प्रकारचे काम करून एक आदर्श घालून दिला आहे. देशाचे संरक्षण करुन येवून आपल्या गावात लोकात सैनिकीबद्ल आत्मविश्वास दाखवून दिला. माजी सैनिक शंकर गावडे, शांताराम गावडे, शिवाजी परब, साबा गावडे, बाळकृष्ण गावडे, आत्माराम गावडे आदी ऊपस्थित होते. आभार माजी सैनिक संजय गावडे यांनी मानले.
आंबोलीतील आजीमाजी सैनिक संघटनेनेच्यावतीने श्रीदेवी माऊली मंदिराच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन…_
