मुक्तांगणतर्फे सत्कार आणि मानवंदना कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१९-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वेंगुर्ला मुक्तांगणतर्फे ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  मांडवी खाडीत पर्यटकांना कांदळवन सफर घडवून आणणा-या वेटलँड चॅम्पियन्स श्वेता हुले यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांना ‘एक पणती कृतज्ञतेची‘ या कार्यक्रमातून मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वामिनी महिला बचतगट आणि मुक्तांगण महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.
You cannot copy content of this page