देवस्थानतर्फे शिक्षणमंत्री केसरकर यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.१९–: शिक्षणमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच वेंगुर्ला दौ-यावर आलेल्या दिपक केसरकर यांनी येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब व सचिव रविद्र परब यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  सत्कारप्रसंगी संजय परब, वासुदेव परब, निखिल घोटगे, प्रथमेश गुरव, सचिन वालावलकर, सुहास मांजरेकर, नितीन मांजरेकर, गणपत केळुसकर, जयू हळदणकर आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page