अंगणवाडीच्या मुलांनी साजरा केला गोपाळकाला

⚡वेंगुर्ला ता.१९-: श्री शिवाजी प्रागतिक शाळेतील अंगणवाडीच्या लहान मुलांनी उत्साहात कृष्णाष्टमी आणि दहीकाला साजरा केला. गेले दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा सण साजर करता आला नव्हता. यावर्षी मात्र, कोणतेचे निर्बंध नसल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

  गुरुवारी अंगणवाडीच्या मुलांनी श्रीकृष्णाचे पूजन केले. त्यानंतर आज शाळेच्या आवारात दहीहंडी फोडून गोपाळकाला केला. लहान मुलांनी कृष्ण, राधा आणि त्यांच्या सवंगड्यांच्या वेशभूषा करुन कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी सर्व शिक्षक आणि पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
You cannot copy content of this page