सावंतवाडी : नगरपरिषदच्या घनकचरा प्रक्रिया केंद्र सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा वाढदिवस सफाई मित्रांनी साजरा केला. अनिल सावंत यांच्या पुढाकारातून सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संजू परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त संजू परब यांनी सफाई मित्रांंना धान्य वाटप केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, माजी नगरसेवक आनंद नेवगी,बंटी पुरोहित,दिलीप भालेकर, अमित परब,विनोद सावंत,पिंट्या सावंत, न.प.चे वैभव नाटेकर आदी उपस्थित होते.
