⚡वेंगुर्ला ता.१८-: १९ जून रोजी पार पडलेल्या एनएमएमएस (आठवी शिष्यवृत्ती) परीक्षेत अणसूर पाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले असून हायस्कूलचा निकाल ८० टक्के लागला.
यात यज्ञेश भास्कर गावडे (९४ टक्के), मंदार बापू नाईक (९२ टक्के), भूपेश बाबली गावडे (७५ टक्के), भूमिका अनंत राऊळ (७४ टक्के) आदींचा समावेश आहे. हायस्कूलमधून ५ पैकी ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना शैलजा वेटे, अक्षता पेडणेकर, राजेश घाटवळ, प्रिती गावडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
