*सरपंच उमदी उदय परब यांच्या हस्ते वितरण
*💫मालवण दि.२७-:* कांदळगाव ग्रामपंचायत तर्फे १४ व्या वित्त आयोगातील निधीतून कांदळगाव जि.प. प्राथमिक दोन्ही शाळांना संगीत साहित्य वाटप करण्यात आले. दोन्ही शाळांना प्रत्येकी एक हार्मोनियम, एक डगा-तबला, एक झुंजरी, एक डफ, एक ड्रम, एक ताशा, एक खुळखुळी, एक ढोलकी आदी साहित्य ग्रामपंचायत सरपंच सौ. उमदी उदय परब यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या प्रसंगी बोलताना सरपंच उमदी परब यांनी यातून विद्यार्थ्यांना लहानपणीच संगीत कलेची गोडी लागून कांदळगावात विविध कलेमध्ये निपुण संगीत कलाकार तयार व्हावे, अशी आशा व्यक्त केली. यावेळी उपसरपंच आनंद आयकर रणजित परब सौ श्रृतिका कुंभार, सौ. भाग्यश्री डिचवलकर, सौ. माधवी कदम, मनोज आचरेकर ग्रामसेवक सागर देसाई, गजानन सुर्वे, अश्विनी लाड, आशिष आचरेकर, सौ. अपर्णा पाटकर तसेच शाळा नं.१च्या मुख्याध्यापिका सौ. ईजाबेन लुईस फर्नाडिस, संध्या मेथर, शाळा नं. २ च्या मुख्याध्यापिका सौ. पल्लवी राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कांदळगावचे संगीत शिक्षक मंगेश कदम हे आठवड्यातून एक दिवस या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देणार असल्याने त्यांचेही सरपंच सौ. परब यांनी आभार मानले.
