माजी खासदार निलेश राणेंचे उद्या जिल्हा भाजपच्यावतीने होणार भव्य स्वागत

भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत;नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब यांनी दिली माहिती*

*💫सावंतवाडी दि.२७-:* भाजपच्या प्रदेश सचिवपदी माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे जिल्ह्यात उद्या गुरुवारी प्रथमच आगमन होत आहे. यावेळी जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिव निलेश राणे यांचे गुरुवारी सकाळी गोव्यातून आगमन होणार असून सकाळी ९ वाजता बांदा, ९.१५ वाजता खामदेव नाका, १० वाजता सावंतवाडी शहर, १०.३० वाजता कुडाळ व ११ वाजता कणकवली येथे भव्य स्वागत होणार आहे. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी संजू परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page