*वेदिक आयुरकेअर ई-स्टोअर इंडियाच्या मालवण शाखचे प्रजासत्ताक दिनी उदघाटन

*💫मालवण,दि.२७-:* वेदिक आयुरकेअर ई-स्टोअर इंडियाच्या माध्यमातून देशातील २५० व्या ‘सर्वात स्वस्त सुपरबाजार’ मालवण शाखा दालनाचा उदघाटन सोहळा काल २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राईड सिग्नेचर, भरड मालवण येथील संकुलात पार पडला. कंपनीचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव, साऊथ इंडिया प्रमोटर संजना परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र गोवा प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर, स्वप्नील गावडे, नारायण कुंभार तसेच नगरसेविका पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, शिवसेना उपशहरप्रमुख यशवंत गावकर, भाई कासवकर, सायली कांबळी, शिल्पा खोत, अमित सावंत यासह अन्य मान्यवर तसेच ग्राहक व नागरिक उपस्थित होते. ग्राहकांना स्वस्त दरात दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू खरेदी करता याव्यात या हेतूने मालवण शहरात खुल्या झालेल्या या ई स्टोअरचे सर्वांनीच कौतुक केले. रात्री उशिरापर्यंत मालवणसह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ई-स्टोअरला भेट देऊन कौतुक करत शुभेच्छा दिल्या. जीवनावश्यक तसेच दैनंदिन वापरातील वस्तू साहित्य याच्या खरेदीवर ग्राहकांना ४ ते ३३ टक्के पर्यत सूट मिळणार असल्याने उदघाटनानंतर पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ई स्टोअरला लाभला. दर दिवशी सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत इ स्टोअर सेवा ग्राहकांना मिळणार आहे. या आणि अवश्य भेट द्या. असे आवाहन ई-स्टोअरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page