⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-: भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पोलिस ठाणे वैभववाडी व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी येथे महिला व पुरुष अशा खुल्या गटात तालुकास्तरीय ५ किमी मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक १६/०८/२०२२ रोजी करण्यात आले.छत्रपती संभाजी चौक ते एडगाव व परत अशा स्पर्धेत धावपटूंचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला.
पुरुष खुल्या गटात ४९ व महिला खुल्या गटात १५ स्पर्धकानी भाग घेतला. यामध्ये पुरुष गटात विठ्ठल संजय गुरव याने १८ मिनीट ३८ सेकंद वेळ नोंदवत प्रथम व महिला गटात हर्षदा शिवाजी बोडेकर हिने २५ मिनीट ३२ सेकंद वेळ नोंदवत प्रथम असे क्रमांक प्राप्त केले. राजेद्र राजाराम गुरखे व प्रतिक्षा रामदास शेलार यानी व्दितीय व मयुर मधुसुदन घाडी व साक्षी शरद राशिवटे यानी तृतीय क्रमांक मिळवला. दोन्ही गटातील तिन्ही विजेत्याना मेडल चषक पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व रोख रक्कम अशी पारितोषिक वैभववाडी पोलिस ठाणे व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या वतीने नगराध्यक्ष, नेहा माईनकर असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन श्री बेलवलकर, रोटरीयन श्री बांदेकर पोलिस निरीक्षक श्री यादव साहेब वैभववाडी रोटरी अध्यक्ष श्री संतोष टक्के, रोटरी सचिव श्री संजय रावराणे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. मॕरेथाॕन स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूना वैभववाडी पोलिस कर्मचारी व इतर रोटरी सदस्यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आली. छत्रपती संभाजी चौक ते दत्तमंदिर अशा सामूहिक मॕरेथाॕनने याची सांगता करण्यात आली. क्रीडा पंच म्हणून श्री अशोक पाटील यानी काम पाहिले. वैभववाडी पोलिस विभाग रोटरी क्लब व आरोग्य विभाग, नगरपंचायत व मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विद्याधर सावंत व आभार संतोष टक्के यानी मानले.
