डॉ. श्रीपाद गिरसागर; ही भूमी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची…
मालवण दि प्रतिनिधी
भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्यपूर्व काळात मालवणचे कार्यही गौरवास्पद आहे गवाणकर, कोचरेकर ,लुडबे यांच्या सारख्या अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ही भूमी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आहे. अशी ही भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया असे प्रतिपादन मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ श्रीपाद गिरसागर यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील लोकनेते आर जी चव्हाण हॉल येथे मातृत्व आधार फाउंडेशन मालवणच्यावतीने स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या मालवण तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटूंबियांना सत्कार सोहळा आणि मालवणातील शाळांमधील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ श्रीपाद गिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी व्यासपीठावर मालवणचे तहसीलदार अजय पाटणे, ऍड समीर गव्हाणकर, उद्योजक सागर वाडकर , माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, अध्यक्ष आपा चव्हाण, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, साईनाथ चव्हाण, विलास हडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दादा वेंगुर्लेकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, सुमेधा नाईक , विश्वास गावकर, आदी व इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी संतोष लुडबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रा सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक केले
यावेळी बोलताना डॉ श्रीपाद गिरसागर म्हणाले, आपण सर्व भगवंताचे अवतार आहोत. प्रत्येक माणसामध्ये चैतन्य आहे त्याच्या मध्ये परमेश्वराचा अंश आहे. थोर पुरुषांनी म्हटले आहे की,भारतभूमी मध्ये जन्म घेणे सोपे नाही ही भूमी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आहे. आपण सर्वच मागच्या जन्मी राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आलेले आहोत असे सांगून ते म्हणाले, आपल्या मनामध्ये कधीच छोटे विचार येता कामा नये नेहमी मोठे ध्येय ठेवले पाहिजे कारण त्यातील शंभर टक्के नाही व थोड्या फार प्रमाणात तरी यश संपादन करता येईल. आणि चांगले काम करणाऱ्याला विरोध असलाच पाहिजे नाहीतर ते कार्य यशस्वी होत नाही. हा देश माझा आहे याची जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे असेही ते म्हणाले
यावेळी बोलताना ऍड समीर गव्हाणकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशन ही संस्था समाजात प्रत्येकाची आई बनून काम करत असते. आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागाचे एकच कारण होते की, देशाला इंग्रजांच्या तावडीतून गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आणि या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केला. दांडी येथील सत्याग्रहामध्ये आमच्या घरातील पाच व्यक्ती एकाच वेळी जेल मध्ये होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ७८ सत्याग्रहींचे पुतळे तयार केले त्यामध्ये गजानन सदाशिव गवाणकरांचा देखील पुतळा आहे. त्या काळामध्ये शंकर कृष्णाजी गवाणकर यांना काँग्रेसने आमदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली आणि विशेष म्हणजे मालवणचे पहिले आमदार म्हणून त्यांना निवडण्यात आले होते असे सांगून ते पुढे म्हणाले, भारतीय नागरिकांच्या अंगामध्ये सळसळणारे रक्त आहे. अनेक लोकांच्या बलिदानाने रंगलेली ही भूमी आहे या भूमीचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आपल्या पूर्वजांनी देश स्वतंत्र होण्यासाठी जे केले ते कार्य खूप महान होते त्या पूर्वजांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करूया असे ते म्हणाले शेवटी आपा चव्हाण यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर यांनी केले
