Headlines

मराठा आरक्षणाची लढाई जिंकणे हीच मेटे यांना श्रद्धांजली

युवराज लखमराजे भोसले यांचे श्रद्धांजली सभेत उद्गार

बांदा/प्रतिनिधी
शिवसंग्रामचे संस्थापक तथा मराठा समाजाचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठा समाजाची फार मोठी हानी झाली आहे. मराठा आरक्षण व इतर प्रश्नसाठी नेहमीच झगडणारे मेटे त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व मराठा बांधवानी एकत्र येत आरक्षणाची लढाई जिंकणे हीच मेटे यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेलं असे उद्गार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे काढले.
बांदा मराठा समाजाच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम सावंत, महिला मराठा सामाज अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, सचिव म. गो. सावंत, माजी सरपंच दीपक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेला माजी सैनिकांचा सत्कार सोहळा रद्द करण्यात आला.
अच्युत भोसले म्हणाले कि, मराठा समाजासाठी आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आरक्षण मिळाल्यास शिक्षण व नोकरीत समाजातील घटकांना न्याय मिळणार आहे. यासाठी सर्वच स्तरावर विनायक मेटे हे समाजासाठी लढत होते. त्यांच्या निधनाने समाजाने अभ्यासू व लढवय्या नेता गमावला आहे. यावेळी बाळू सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
. प्रास्ताविक म गो सावंत यांनी केले. यावेळी समाज बांधवांच्या वतीने मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बांदा शहर व परिसरातील सामाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page