सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांच्या उपोषणाला प्रवाशी संघटनेचा पाठींबा

⚡कणकवली ता.१६-:
मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे ज्या समस्या आहेत.त्या समस्या सोडत नाही.तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते ,माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी घेतला आहे.जोपर्यंत मागण्यांबाबतीत प्रत्यक्ष कामे होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याच्या मुद्यांवर नागेश मोरये ठाम आहेत.त्याच्या या उपोषणाला प्रवाशी संघटनेने पाठींबा दिला आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशी संघटना अध्यक्ष मनोहर पालयेकर ,जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र मुसळे,प्रवीण आरोलकर यांनी भेट देत पाठींबा दिला आहे. तसेच कणकवली तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष नामदेव जाधव,चिटणीस महानंद चव्हाण यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे.जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे यांनाही या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,दीपक महाडीक, अशोक मोरये आदी उपस्थित आहेत.

You cannot copy content of this page