असलदे गावातील रत्नांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त केला गौरव

⚡कणकवली ता.१६-: असलदे ग्रामपंचायतच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सरपंच,गुणवतांचा अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या कर्तृत्ववाबद्द्ल,गावाच्या विकासात्मक असलेल्या तळमळीबद्दल कोळोशी-हडपीड हायस्कूल मुख्याध्यापक प्रमोद लोके,पत्रकार भगवान लोके यांनी कौतुक केले.

असलदे ग्रामपंचायत रामेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

असलदे उपकेंद्रासाठी ५ गुंठे जमीन विनामूल्य जमीन मालक रामचंद्र लोके गुरुजी यांनी दिली,त्याबद्दल त्यांचा सत्कार असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.तसेच त्यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजारोहण करण्याचा मानही देण्यात आला.गावच्या विकासात हातभार लावणारे सोसायटी चेअरमन व पत्रकार भगवान लोके,ग्रामिण भागातून पत्रकारीता करीत असलेले ऋषिकेश मोरजकर ,उत्तम सावंत,निकेत पावसकर ,सचिन राणे,आनंद तांबे,अनंत पाताडे यांचाही शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

असलदे गावातील जे देशासाठी लढले,ते माजी सैनिक चंद्रकांत गंगाराम तांबे,महोदव बाबाजी तावडे, विश्वास गणपत राणे , व कै.गणपत विठ्ठल राणे यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. माजी उपसभापती कै.शाताराम शंकर मोरजकर , माजी उपसभापती चंद्रकांत केशव डामरे यांचाही सत्कार करण्यात आला. माजी सरपंच अंकुश डामरे , कै.अंकुश परब ,रविंद्र हडकर,संतोष वायंगणकर,सुरेश लोके,वंदना हडकर,दिलीप फोंडके,कै. शामराव तांबे,लक्ष्मण लोके,संध्या परब ,सुनिता लोके, विलास जांभळे, तसेच विदयमान सरपंच पंढरी वायंगणकर,उपसरपंच संतोष परब,माजी चेअरमन प्रकाश परब,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,ग्रामसेवक आर.डी.सावंत ,ग्रा.पं.सर्व कर्मचारी यांचा सत्‍कार करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे गावचे सुपुत्र कोळोशी हडपिड हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रमोद लोके,दिवीजा वृद्धाश्रम अध्यक्षा दिपीका रांबाडे,माजी पोलीस पाटील कै.तुळशिराम तांबे यांच्या कुटबियांचा व पोलीस पाटील सावित्री पाताडे, अभिनेता सुधीन तांबे यांचाही सन्मान करण्यात आला. असलदे गावातील दहावी, बारावी गुणवतांचा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी गावात प्रत्येक कुटुंबाला सुका कचरा व ओला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर,
ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी, दिनेश तावडे, निलिमा तांबे,प्रतिभा खरात,संचिता नरे श्रीम , वंदना हडकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर ,प्रास्ताविक ग्रामसेवक आर.डी.सावंत, तर आभार संरपच पंढरी वायंगणकर यांनी मानले.

You cannot copy content of this page