नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

⚡सावंतवाडी ता.१६ : जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा काल अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी कॅबिनेट मंत्री, शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाल.

या सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. नेमळे सरपंच विनोद राऊळ यांच्या माध्यमातून प्रयत्नातून ही वास्तू उभारली गेली आहे. यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण, दीपक केसरकर यांच सहकार्य लाभलं आहे.

यानिमित्त उपस्थित मंत्री दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सत्कार ग्रामपंचायतच्यावतीनं करण्यात आला. गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानं सरपंच विनोद राऊळ यांनी दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले.

You cannot copy content of this page