स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत गोठोसचे नूतन वास्तूमध्ये प्रवेश

विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन

⚡कुडाळ ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत गोठोस काल नूतन वास्तूमध्ये प्रवेशित झाली. यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांची मुख्य उपस्थिती होती. युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून नूतन वास्तूचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी गोठोस ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते विशाल परब यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, कुडाळ पंचायत समिती माजी सभापती मोहन सावंत, नारूर सोसायटी अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ पंचायत समिती माजी सदस्या प्रमिला सावंत, नारूर सोसायटी उपाध्यक्ष शंकर निकम, वाडोस सरपंचा संजना म्हाडगूत, सरपंच सूरज कदम, सदस्य राजा धुरी, सदस्या वैशाली धुरी, सदस्या अस्मिता लाड, सदस्या वैशाली भितये आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे, युवा नेते विशाल परब यांनी ग्रुप ग्रामपंचायत गोठोस नूतन वास्तू प्रवेशित झाल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच आपण गोठोस गावच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन युवानेते विशाल परब यांनी केले.

You cannot copy content of this page