⚡सावंतवाडी ता.१६-: भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत हुतात्म्यांच्या समर्पणातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली त्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी ‘मशाल रॅली’ काल संध्याकाळी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यासाठी आली.
या मशाल रॅली सावंतवाडी उद्यान शेजारी हॉटेल मॅंगो टू पासून प्रारंभ करून मिलाग्रीस शाळेकडून संपूर्ण बाजारपेठेतून गांधी चौक मार्गे बँक ऑफ इंडिया उभा बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर
काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मशाल रॅली काढण्याचे निर्देश दिले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका सरचिटणीस काशिनाथ दुभाषी ,तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस ,जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक ईफ्तेकार राजगुरू, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, राकेश नेवगी, रत्नागिरी जिल्हा महिला निरीक्षक सौ दर्शना बाबर देसाई, युती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला शहर अध्यक्ष अँड सायली दुभाषी, तालुका सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, रोहन परब ,रजब खान, सौ पूजा दळवी ,वि जे एन टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, मनोज वाघमोरे, सौ देवयानी टेमकर, संदीप राणे व पदाधिकारी उपस्थित होते.
