⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ : कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. २ शाळेच्या विद्यार्थ्यांनी काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभातफेरी व पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली.
या पथनाट्यात त्यांनी स्त्री शिक्षण, मोबाईलचे दुष्परिणाम व राष्ट्रीय एकात्मता या विषयी जनजागृती केली. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जावडेकर यांनी खास मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार गावडे, केंद्रप्रमुख लंगवे मॅडम, मुख्याध्यापक खानोलकर मॅडम, शिक्षक गवस मॅडम, फाले सर, लंबे सर, जाधव सर ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.
