⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आरोस येथील धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बाळा परब व विजय सोनावळे मित्र मंडळाने वह्यांचे व खाऊचे वाटप केले.
यावेळी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब, शाळा समिती अध्यक्ष मंगेश येडगे, शिक्षक वरक सर, ग्रामस्थ चंद्रकांत घोगळे, दर्शना परब, समिधा आरोसकर, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
नेहमीच सहकार्याची भावना ठेऊन समाजासाठी कार्य करण्याच्या हेतूने हे दोन्ही मित्र मंडळ काम करत आहेत.
यावेळी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश (बाळा) परब यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच दिलेल्या वह्यांचा योग्य रीतीने वापर करावा, असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी तेथील ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब यांना आपल्या वाडीतील,नळयोजना,लाईट,रस्त्याच्या समस्यांबाबत माहिती दिली.यावर यावेळी चर्चा करण्यात आली.तसेच आपण लवकरात लवकर येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वरक सरांनी केले.
